शाळांमध्येही मनशक्‍ती अभ्यास

वाई ः किसनवीर महाविद्यालयात योगा करण्यासाठी सहभागी झालेले विद्यार्थी.

मुलांवर झालेल्या परिणामांचे मुल्यमापनही होणार
प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून एका मन:शक्‍ती प्रयोगकेंद्राला शाळांमध्ये मनशक्‍ती विषयक कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आता विविध शाळांमध्ये मनशक्‍ती विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे राज्य विद्या प्राधिकरणाकडून या कार्यक्रमाचे मुल्यमापन होणार असून मुलांवर होणाऱ्या चांगल्या वाईट परिणामांबाबतचा अहवालही शासनाला पाठविण्यात येणार आहे.
लोणावळा येथील मनशक्‍ती प्रयोगकेंद्र “रेस्ट न्यू वे’ या संस्थेच्या माध्यमातून हे धडे देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना तणावमुक्‍त अभ्यास, परीक्षेवरील ताण कमी करण्यासाठी मेंदूशास्त्र व मानसशास्त्र आदी विविध शास्त्रांवर आधारित प्रयोग, अभ्यासाच्या सोप्या पध्दती, परीक्षा काळातील धैर्य, स्मरणशक्‍ती वाढविणे तसेच सर्वांगीण विकासासाठी कसे प्रयत्न करावेत याबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मात्र मनशक्‍ती अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांवर कोणतीही सक्‍ती करता येणार नसल्याचेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. दरवर्षी किती विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला याची माहिती शासनाला पाठविणे गरजेचे आहे. तसेच, विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे मुल्यमापनही करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)