शाळांमधील ग्रंथपालांना खुशखबर

अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून मिळणार नियुक्‍ती

पुणे – शालेय शिक्षण विभागाकडून वाचन संस्कृतीचा जागर केला जात असला तरीही खासगी अनुदानित शाळांमधील 596 ग्रंथपालांची पदे रिक्‍त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच आता अर्धवेळ ग्रंथपालांनाच पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून नियुक्‍ती देत शासनाकडून या जागा भरण्यात येणार आहेत.

राज्यात अनुदानित शाळांमध्ये 2 हजार 409 पूर्ण वेळ ग्रंथपाल तर 2 हजार 322 अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून पदे मंजूर आहेत. 2016 च्या वेतन देयकानुसार राज्यात 1 हजार 813 पूर्ण वेळ तर 1 हजार 615 अर्धवेळ ग्रंथपाल कार्यरत आहेत. याचाच अर्थ राज्यात मंजूर पदे व कार्यरत पदांमध्ये 596 पदांची कमतरता आहे. त्यामुळेच सध्या राज्यात अर्धवेळ कार्यरत असणाऱ्यांपैकीच 596 जणांना सेवा जेष्ठतेनुसार पूर्णवेळ म्हणून नियुक्‍ती दिली जाणार आहे. अर्धवेळ ग्रंथपालांना सध्या सेवा संरक्षण व इतर लाभ मिळत नसल्याने त्यांनाच सामावून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार विभागवार सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात येणार असून त्यांची नियुक्‍ती करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांची रिक्‍त जागांवर नेमणूक करण्यात येईल. जे ग्रंथपाल नियुक्‍त केलेल्या जागी जाण्यास तयार नसतील अशांना दुसऱ्या ठिकाणी किंवा नंतर पूर्णवेळ सेवेत येता येणार नसल्याचेही शासनाने ठरविले आहे.

ग्रंथपालांच्या जागांबाबत शासनाने समिती नेमली होती. या समितीचा अहवाल शासनाकडे तीन वर्षांपूर्वी दिला गेला होता. या अहवालात सर्व 1 हजार 615 अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण करण्याबाबत शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांत निर्णय घेतो, असे लेखी आश्‍वासनही शासनाने दिले होते. त्यामुळे केवळ 596 जणांबाबत निर्णय घेऊन शासनाने बाकींवर अन्याय केला आहे. सर्वांना पूर्ण वेळ करावे, अशी आमची मागणी आहे.
– शिवाजी खांडेकर, सचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर संघटना महामंडळ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)