शाळांबाहेर निकृष्ट खाऊची विक्री

संग्रहित फोटो

भवानीनगर- बारामती शहरासह लगतच्या उपनगरीय भागातील शाळांच्या बाहेर हातगाड्या, स्टॉल लावून काही विक्रेते खाऊची विक्री करीत असतात. शाळेबाहेर मिळत असलेल्या या खाऊचा दर्जा अतिशय निकृष्ट असतोच शिवाय अशा विक्रेत्यांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधी सुपाऱ्यांच्या पुड्याही मिळत आहेत, अशा सुपाऱ्या खाणे कोवळ्या वयातील मुलांकरिता हानीकारक ठरू शकते. परंतु, याकडे शाळा प्रशासन तसेच अन्न औषध प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे.
शाळा परिसरात कोणत्याही प्रकारच्या आमली पदार्थांची विक्री करण्यास कायदेशीर बंद आहे. परंतु, अन्न औषध प्रशासनाचा हा नियम मोडीत काढून अनेक शाळांबाहेर सुगंधी सुपारी, पानांचा स्वाद असलेल्या गोळ्या, सिंगारेट प्रमाणे दिसणाऱ्या चॉकलेटच्या नळ्या या सारखे दर्जाहिन पदार्थ सर्रास विक्री केले जात आहेत. दहावीचे वर्ग असलेल्या शाळांलगत असलेल्या अशा खाऊ विक्रेत्यांकडे गुटख्याच्या पुड्याही सहज मिळत असल्याने अल्पवयीन विद्यार्थी व्यसनांकडे कोवळ्या वयातच वळू लागले आहेत. गुटखा विक्रीला बंदी असल्याने यातूनच जादा रकमेला अशा पुड्या विकल्या जात आहे. यातून चांगला नफा मिळत असल्याने विक्रेतेही असाच माल विकत आहेत. शाळा परिसरात सुगंधी सुपारीच्या नावाखी सुंगधी सुपारी, रंगीत सुपारी, खुशबूवाली सुपारी, पान मसाला या नावाखाली गुटखाही विक्री होत आहे. पोलीसांनी किमान शाळा परिसरात तरी सुपारी आणि गुटखा बंद करावा, अशी मागणी पालकांतून होत आहे.

  • शाळा बाहेर पडलेल्या पुड्यांवरील पत्यानुसार माहिती मिळाली असता धुळे येथे मुंबई-आग्रा महामार्गावरील औद्योगिक वसाहतीत तसेच गुजरात मधील गांधीनगर भागातील सुमार दर्जाच्या कंपन्यांकडून सुगंधी सुपारीचे उत्पादन घेतले जाते, अशी सुपारी येथील काही तज्ज्ञ व्यापाऱ्यांना दाखविली असता ती अतिशय निकृष्ठ असल्याचे सांगण्यात आले. याच भागातून राज्यभरात असा माल जात असल्याचे पोलीस सुत्रांचेही म्हणणे आहे.
  • इंदापूर, बारामती शहर तसेच परिसरात निकृष्ट दर्जाची सुपारी, पान मसाला यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. विशेषत: अतिग्रामीण भागातील शाळा परिसरांत असणाऱ्या टप्यांतून अशा सुपाऱ्यांच्या विक्रीतून होणारी उलाढाल मोठी आहे. अन्न-औषध प्रशासन विभागाने शाळा परिसरात जावून निकृष्ट खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत गांभीर्याने कारवाई होण्याची गरज आहे.
  • शाळा परिसरात गुटखा, सुगंधी सुपारी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करू. माहिती दिल्यास तपासणी पथकसह छापा टाकून कारवाई करू. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
    – अरविंद काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वालचंदनगर

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)