शाळांबरोबरच विद्यार्थ्यांनाही मदतीच्या हातांची गरज

  • बाळासाहेब गावडे : शिरसवडी येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

वाघोली – ग्रामीण भागातील शाळा व शाळेत शिक्षण घेणारी बालके यांची गुणवत्ता सध्या बदलत असून ग्रामीण भागाचा चेहरा बदलवणारी असतानाच शाळा व शाळेत शिक्षण घेणाऱ्या या दोघांनाही मदतीच्या हातांची गरज असल्याचे प्रतिपादन शिरसवडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळासाहेब गावडे यांनी केले. शिरसवडी ग्रामपंचायतीकडून शिरसवडी हद्दीतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले, त्यावेळी गावडे बोलत होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अंगणवाडी, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सर्व मुला-मुलींना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी दीप्ती नागवडे, सतीश नागवडे, संतोष गोते, सुरेखा खेडेकर, रमेश कदम, किशोर शिंदे, ज्ञानेश्वर गावडे, महादेव चितळकर, प्रमोद गोते, अनिल शिंदे, रमेश गावडे, तुळशीराम खेडेकर, विनायक गावडे, दादासाहेब लोणारी, संगीता गावडे, अलाउद्दीन मुलाणी, कुंडलिक गावडे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)