शाळांनी धान्यसाठ्याची माहिती पोर्टलवर भरावी

शिक्षण विभागाच्या शाळाप्रमुखांना सूचना

पुणे – राज्यातील शाळांनी शालेय पोषण आहार योजनेतील शिल्लक धान्यसाठ्याची माहिती तत्काळ पोर्टलवर भरावी, अशा सूचना शासनाच्या शिक्षण विभागाकडून शाळाप्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत.

-Ads-

शासनाच्या अनुदानातून शाळांमध्ये पोषण आहार योजना राबविण्यात येते. शाळांना तांदूळ व इतर धान्याचा पुरवठा हा शासनाकडून नेमलेल्या पुरवठाधारकाकडून करण्यात येतो. हे धान्य शिजवून विद्यार्थ्यांना वाटप करण्याची जबाबदारी ही संबंधित शाळांवरच सोपविण्यात आलेली आहे. योजनेची सर्व परिपूर्ण माहिती पोर्टलवर भरण्याचे शाळांना बंधन घालण्यात आलेले आहे. मात्र बऱ्याचशा शाळा नियमित माहिती भरत नाहीत. धान्याचा साठा अपुरा पडू लागल्यानंतर शाळांना जाग येत असते.

लाभार्थ्यांची संख्या, दररोजची विद्यार्थ्यांची उपस्थिती, धान्याचा वापरलेला व शिल्लक राहिलेला साठा याबाबतची सर्व माहिती पाठवावी लागणार आहे. 30 नोव्हेंबर अखेरपर्यंतची माहिती शाळांनी अचूकपणे भरणे आता आवश्‍यक करण्यात आलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)