शाळांनी अध्यक्ष चषकासाठी प्रयत्न करावा

रेडा- लाखो रुपयांचा शैक्षणिक उठाव लोकसहभागातून गोळा करून शाळा डिजीटल केलेल्या आहेत, व इंदापूर तालुक्‍यातील शाळांनी अध्यक्ष चषकासाठी प्रयत्न करून तालुक्‍याचा नावलौकीक वाढवावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप यांनी केले. इंदापूर तालुक्‍यातील गलांडवाडी नं1 केंद्रातील शिक्षण परिषदेची बैठक घोलप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शरद चितारे, आरशाद सय्यद, उजेर शेख, सुनिल मखरे, वसंत फलफले, रवींद्र सातव, प्रशांत घुले, संतोष शिंदे उपस्थित होते
करणसिंह घोलप म्हणाले की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढतच आहे. शिक्षकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. विस्थापित शिक्षकांना सोयीच्या शाळा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तालुक्‍यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक हे गुणवत्तावान आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त निवड होणारे अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले असतात. इंग्रजी अध्ययन समृद्धि कार्यक्रमातून इंग्रजीचा दर्जा वाढलेला दिसून येत आहे. एकंदरीतच जिल्हा परिषद शाळांनी स्पर्धेत उतरून आपले आव्हान कायम ठेवले आहे, आम्ही त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू अशीही ग्वाही त्यांनी दिली. यावेळी केंद्रातून बदली झालेल्या आणि केंद्रात बदली होऊन आलेल्या शिक्षकांचा सत्कार करणसिंह घोलप, महेंद्र रेडके आणि सरपंच रतन कचरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख शेषराव राठोड, सूत्रसंचालन सुहास मोरे तर जमीर शेख यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)