शाळांना ‘ऑनलाईन’ मिळणार मान्यता

संग्रहित फोटो

संगणक प्रणाली विकसित : खर्चासाठी दोन कोटी मंजूर

पुणे – राज्यातील नवीन स्वयंअर्थसहाय्यित शाळांना मान्यता व दर्जावाढ करण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी राज्य शासनाने 2 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे.

राज्य शासनाकडून दरवर्षी नवीन शाळा सुरू करणे व दर्जावाढ करणे यासाठी विविध संस्थांकडून अर्ज मागविण्यात येतात. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संस्थांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी बऱ्याचदा खूप कालावधी घालविला जातो. आता यात मान्यतेच्या प्रक्रियेतच सुधारणा करण्याचे नियोजन शासनाने केले आहे. शासनाकडे दाखल झालेल्या प्रस्तावांना लवकर मंजुरी देता यावी यासाठी शासनाने ऑनलाईन संगणक प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्प अंमलबाजवणी समितीच्या 12 सप्टेंबर 2017 रोजी झालेल्या बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली आहे.

कामाचा आराखडा तयार
स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू करणे व शाळांची दर्जावाढ करणे ही कामे व्यवस्थीत पार पाडण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी 1 कोटी 96 लाख 54 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. शिक्षण आयुक्तांच्या स्तरावरून ई-निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली आहे. यातून एनवायएसए कम्युनिकेशन या कंपनीची कामासाठी निवडही करण्यात आली आहे. या कंपनीने कामाचा आराखडाही तयार केला आहे. कामाचे दोन टप्पे कंपनीने पूर्ण केलेले आहेत. या केलेल्या कामापोटी त्यांना 8 लाख 62 हजार 900 रुपये निधी अदा करायचा आहे. यासही शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाचे कार्यासन अधिकारी प्रविण मुंढे यांनी याबाबतचे आदेशही काढले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)