शाळांच्या सुधारणांसाठी मावळमध्ये प्रायोगिक उपक्रम

पुणे – जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तोमत्तम शिक्षण देण्याबरोबरच शाळेची गुणवत्ता वाढीसाठी आता शिक्षण विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी तालुक्‍यातील केंद्रमुखांना शाळेची गुणवत्ता वाढ कशा पद्धतीने वाढवता येईल, त्यासाठी कोणते बदल आवश्‍यक आहे, शिक्षण पद्धती आणि शाळांची सुधारणा या सर्व बाबींची माहिती प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यात प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्याचे पूर्ण नियोजन झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

पुणे जिल्ह्यात एकूण साडेतीन हजार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. परंतु, खाजगी शाळांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा कल काहीशा कमी-अधिक प्रमाणात आहे. सध्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांकडून उत्तमप्रकारे शिक्षणाचे धडे दिले जातात. त्यामुळे काही शाळांचा निकाल 100 टक्के आहे. परंतु, काही शाळा शिक्षण आणि गुणवत्तेमध्ये मागे असल्यामुळे एकूणच शिक्षणाची गुणवत्ता कमी झाल्याचे दिसून येते. शाळांच्या इमारती टोलेजंग उभ्या राहिल्या, मैदानांची सुविधा दिली, शिक्षक दिले, विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. मात्र, मुलांच्या शिक्षणाचा दर्जा, गुणवत्ता यामध्ये काही ठिकाणी सुधारणा होत नसल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याबाबत मुंबई येथील राज्य शिक्षण विभागाचे अधिकारी आणि आयुक्त यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीदरम्यान, नेहमी प्रशासकीय कामात अडकलेले केंद्रप्रमुख यांना थोडीशी सवलत देऊन, शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचना दिल्या. त्यानुसार मावळ 305 केंद्रप्रमुखांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये शाळां आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील, त्यासाठी केंद्रप्रमुखांची जबाबदारी काय, त्याची वाटचाल कशी राहिल, कोणते बदल अपेक्षित आहे, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्याचे पूर्ण नियोजन झाले असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)