शाळांच्या जगतात..

पतंगप्रेमींनी लुटला आनंद
गोयल गंगा फाउंडेशनकडून बावधनमधील गंगा लेजंड येथे पतांगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक पतंगप्रेमींनी पतंगबाजीचा आनंद लुटला. सकाळी 10 वाजता महोत्सवाला सुरुवात झाली खरी पण, पतंग उडविण्याचा आनंद घेण्यासाठी आतूर झालेले पतंगप्रेमी वेळेपूर्वीच कार्यक्रमस्थळी हजर होते. यात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यासह लहान मुले, महिला, वयोवृद्धांनीही पतंगोत्सवाचा आनंद लुटला. गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयलही यावेळी उपस्थित होते.


राठी विद्यालयात वैद्यकीय तपासणी
महाराष्ट्र विद्या मंडळाच्या रामचंद्र राठी मराठी माध्यमिक विद्यालयात नुकतीच इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आलेल्या डॉक्‍टर्सच्या टीमने विद्यार्थ्यांचे जनरल चेकअप केले. तसेच विद्यार्थ्यांचे डोळे आणि दात तपासण्यात आले. समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दारात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाला रोटरी क्‍लब ऑफ पुणे मेट्रोचे अध्यक्ष माधव तिळगुळकर, आदिती कदम, भावना चौहुरे उपस्थित होते. उपक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी जोशी आणि इंटरॅक्‍ट क्‍लब प्रमुख मधुरा मोने यांनी केले.


-Ads-

नारायणराव सणस विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
रयत शिक्षण संस्थेच्या नारायणराव सणस विद्यालयात 69 वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्षा विभावरी सणस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाच्या इयत्ता नववी आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली. मॉक ड्रील प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. राजेंद्र देशपांडे, संतोष राऊत, महेंद्र जोशी यांनी या विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर शेटे, स्थानिक सल्लागार समिती सदस्य अक्रुरशेठ कुदळे, उपमुख्याध्यापक प्रकाश सबनीस, पर्यवेक्षक संभाजी पाटील, ऊर्मिला पाटील, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


भावे हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
भावे हायस्कूलमध्ये घोषपथकाच्या गजरात, राष्ट्रीय सलामीने ध्वजारोहणाने सुरुवात झालेल्या प्रजासत्ताकदिन सोहळा आनंदात संपन्न झाला. याप्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशालेचे प्रयोगशाळा सहाय्यक व माजी विद्यार्थी सी. आर. काशिद यांच्या हस्ते झाले. काशिद यांनी जीवनाचे सार याविषयी सांगितले. प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विविध प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. यात साधन कवायत, योगासने, सूर्यनमस्कार, मानवी मनोरे, लेझीम ही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक आर. डी. भारमळ, उपमुख्याध्यापिका कांता इष्टे, पर्यवेक्षिका भारती तांबे, पालक शिक्षक संघाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.


नूमवित प्रजासत्ताक दिन साजरा
नूमवि प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीतील प्रथम आलेली विद्यार्थिनी रचना राऊत हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजसलामी, राष्ट्रगीत, ध्वजप्रतिज्ञा, संविधान वाचन, झेंडागीत विद्यार्थ्यांनी सादर केले. मीत परदेशी, चेतन श्रीराम व रचना राऊत यांनी यावेळी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे, उपमुख्याध्यापिका सरिता गोखले, अंजली दाढे, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वसंतराव सखाराम सणस यांना अभिवादन
रयत शिक्षण संस्थेच्या नारायणराव सणस विद्यालय व वसंतराव सखाराम सणस कनिष्ठ महाविद्यालयात वसंतराव सखाराम सणस ऊर्फ नाना यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रथम विद्यालयाचे प्राचार्य शंकर शेटे यांनी नाना यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी प्राचार्य शंकर शेटे यांनी नानांच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी केलेला त्याग, सणस विद्यालयास केलेले सहकार्य व त्यांच्या कुटुंबीयांचे दातृत्व याविषयी माहिती सांगितली. यावेळी उपमुख्याध्यापक प्रकाश सबनीस, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


अभिनवमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात
आजच्या काळातील विद्यार्थ्यांना भारताचा खरा इतिहास गरज निर्माण झाली असून आपण राहत असलेल्या देशाप्रती आपलीही काही कर्तव्य आहेत, याची जाण प्रत्येकाला व्हायला हवी, असे प्रतिपादन मराठी अभिनेता “कौल’ मराठी चित्रपटफेम रोहित कोकाटे यांनी केले. आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि जुनिअर कॉलेजमध्ये 69 व्या प्रजासत्ताक दिनाचे आयोजन केले होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सेक्रेटरी सुनीता जगताप, ऍड. दिलीप जगताप, सहसेक्रेटरी निर्मोही जगताप पालक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पूर्व प्राथमिक, प्राथमिक,आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर संस्कृतिक कार्यक्रम सादर केले.


रास्ता पेठेतील प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा
रास्ता पेठेतील प्राथमिक शिक्षण मंडळ संस्थेच्या प्राथमिक शाळेत 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्राच्या अध्यक्षस्थानी प्रतिसाद कम्युनिकेशनचे अभिजीत जोग होते. त्यांच्या हस्ते यावेळी झेंडावंदन करण्यात आले. तर संस्थचे उपाध्यक्ष रमेश जैन यांनी जोग यांचा सत्कार केला. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम, कवायत प्रकार तसेच समरगीते सादर केली. यावेळी शाळेतील हुशार विद्यार्थिनी कृतिका पाडमुख व विद्यार्थी श्रीराज गुरसाळे यांना अध्यक्षांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे चिटणीस अनिल नवले, कै.मानसी जोशी फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत जोशी, व बार्टी संस्थेच्या समतादूत मीना कूर्मवंशी आदी उपस्थित होते. कार्यक्राचे सुत्रसंचालन मनीषा पारकर यांनी केले तर आभार अर्चना लांडगे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियाजन मुख्याध्यापिका शुभांगी सदनकर यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)