शाळकरी मुलीने वाचला अवैध दारूविक्रीच्या त्रासाचा पाढा

टाकळीभान – प्रजासत्ताकदिनी आयोजित टाकळीभानची (ता.श्रीरामपूर) ग्रामसभा अवैध दारू विक्रीमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर चांगलीच गाजली. एका शाळकरी मुलीने राहत्या घराजवळ होत असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे होणाऱ्या त्रासाचा पाढा थेट ग्रामसभेत वाचला. त्यामुळे गावपुढारी, ग्रामस्थही अवाक्‌ झाले. अखेर दारूबंदीबाबत ग्रामसभेचा ठराव देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.

अध्यक्षस्थानी सरपंच रुपाली धुमाळ होत्या. माजी सभापती नानासाहेब पवार, तंटामुक्‍त समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब दाभाडे, माजी सरपंच मंजाबापू थोरात, चित्रसेन रणनवरे, राहुल पटारे, भारत भवार, तलाठी आकांक्षा ढोके, कृषी सहाय्यक जया निमसे, आरोग्य केंद्राचे शेख, बनसोडे, दिलीप फुलवर, सरदार पटेल, दादासाहेब कोकणे, आदी उपस्थित होते. बसस्थानक परिसरात गेल्या काही महिण्यांपासून अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट आहे. मद्यपींच्या धांगडधिंग्याने रहिवाशी त्रस्त आहेत. याबाबत एका शाळकरी मुलीने दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार देऊन व्यथा मांडली होती. मात्र दखल घेतली गेली नसल्याने त्या शाळकरी मुलीने थेट ग्रामसभेत व्यथा मांडून न्याय मिळण्याची मागणी केली. याबाबीची ग्रामसभेने चांगलीच दखल घेत दारुबंदीचा ठराव जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यावर शिक्‍कामोर्तब केले. ग्रामपंचातीच्या जागेत अवैध धंदे करणारांवर कारवाईचा ठराव करण्यात आला.
नानासाहेब पवार म्हणाले की, गावाच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. ग्रामस्थांनी हक्काबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवली तर विकास योजना चांगल्या प्रकारे राबविता येतील. रस्त्याच्याकडेला होणारे अतिक्रमण स्वतःहून काढून घेतल्यास कारवाई टाळणे शक्‍य होईल. पाणीपुरवठा, पक्‍के रस्ते, भूमिगत गटारी, शौचालय ही कामे प्रगतीपथावर आहेत.
मंजाबापू थोरात यांनी जुनी पाणी टाकीमोडकळीस आली. तरीही पाण्याच्या टाकीची साफसफाई होत नसल्याने दुषीत पाणी पुरवठा केला जात असल्याचे सांगितले. राहुल पटारे यांनी रस्त्याच्याकडेला झालेल्या अतिक्रमणांमुळे वारंवार अपघात होत असल्याने पर्यायी रस्ते होण्याची मागणी केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)