शाळकरी मुलांना पट्टय़ाने जबरदस्त मारहाण

अंधकऱ्या खोलीत सिगारेटचे चटके देऊन लावला गळ्यावर चाकू 

लातूर – दोन शाळकरी विद्यार्थ्यांना दुचाकीवरून जात असताना इतर दोन तरुणांनी त्यांना धाक दाखवून पळवून नेले. आणि एका अंधाऱ्या खोलीत घेऊन गेले. तिथे त्यांना सिगारेटचे चटके देण्यास सुरुवात केली. नंतर त्यांच्या गळ्यावर चाकूही ठेवण्यात आला. या धक्कादायक प्रकरणाची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील इतर शहरातून विद्यार्थी शिकण्यासाठी लातूर मध्ये येतात, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी ते खाजगी शिकवणी लावतात. लातूर शहरातील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या खाजगी शिकवणी उद्योग परिसरामध्ये गेल्या काही वर्षांपासून गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच मुलींचे छेडछाडीचे प्रकार, मुलांना धाक दाखवून मोबाईल व पैसे पळवणे असे गुन्हे वाढीस लागले आहे.

गुरुवारी सायंकाळी शहरात झालेल्या प्रकाराची दखल पालकमंत्र्यांनीही घेतली. आणि त्या ठिकाणी एक स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्याचे आदेश दिले व गेल्याच आठवडय़ात पोलीस चौकीचे उद्घाटन झाले. उच्चदर्जाचे ५३ सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण परिसरामध्ये बसवण्यात आल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम अद्याप सुरु आहे.

दुचाकीवरून जाणाऱ्या दोन शाळकरी मुलांना तरुणांनी धाक दाखवून व मारहाण करून पळवून नेले. उषाकिरण पेट्रोलपंपाच्या परिसरात नेऊन अंधारात या दोघांना पट्टय़ाने जबरदस्त मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना सिगारेटचे चटके दिले. तेथून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नेऊन तेथे अन्य दोघांनी मारहाण केली व त्यांच्या गळय़ावर चाकू ठेवून ठार मारण्याची धमकी दिली, असे पीडित मुलाचे म्हणणे आहे. या सर्व प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्या मुलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने व शहर पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची माहिती घेऊन त्यात पोलीस लक्ष घालत असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)