शालेय स्तरावर आता “कम्युनिटी पोलिसिंग’

पोलीस आयुक्‍तांचा पुढाकार : दत्तवाडीत उपक्रम

पुणे – शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी तसेच अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारीकडे वळू नयेत, यासाठी पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून शालेय स्तरावर “कम्युनिटी पोलिसिंग’चा प्रयोग दत्तवाडी पोलिसांनी राबवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुन्हे जर कमी करायचे असतील, तर त्यासाठी अल्पवयीन मुलांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी या क्षेत्राकडे वळू नये यासाठी त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना शाळेमध्येच मार्गदर्शन करणे आवश्‍यक आहे. ही बाब लक्षात घेऊन दत्तवाडी पोलिसांनी शाळांमध्ये होणाऱ्या स्नेह संमेलनाला उपस्थिती लावत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. स्नेह संमेलनात पालक व पाल्य दोघेही उपस्थित असतात. यामुळे तेथे केलेले मार्गदर्शन योग्य पद्धतीने पोहचते. याची सुरूवात रावसाहेब पटवर्धन हायस्कुल व अरण्येश्‍वर इंग्लिश मीडियम स्कुल येथे करण्यात आली. या स्नेहसंमेलनाला दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक कृष्णाची इंदलकर, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, रुपाली कुलथे, सहायक पोलीस फौजदार रमेश मुजमले, पोलीस हवालदार श्रीकांत शिरोळे, प्रवीण जगताप, कॉन्स्टेबल विशाल साळुंखे, रोहन खैरे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीसकाकांची विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी हायस्कूलच्या वतीने वर्षा गुप्ते, शिवाजी खांडेकर, श्रीमती हजारे, बाळासाहेब ढुमे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)