शालेय साहित्य वाटपात गोंधळ वाटप सुरूच

शालेय साहित्य वाटपात गोंधळ वाटप सुरूच
प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि. 27 – महापालिकेच्या शिक्षण विभागात वाटप केल्या जाणाऱ्या शालेय साहित्याचा गोंधळ संपण्यास तयार नाही. या पूर्वी मुलांना देण्यात आलेली दप्तरे आणि वह्या निकृष्ट घडल्यानंतर मुलांना देण्यात येणारे बूट स्पेसिफिकेसन नुसार देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. या मुलांना लेस नसलेला बुट देणे आवश्‍यक असताना मुलांना प्रत्यक्षात लेस असलेल्या बुटांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने ठरवून दिलेल्या निकषांनुसार, हे साहित्य दिले जात नसल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या डायरेक्‍ट टू बेनिफिट (डीबीटी) योजने अंतर्गत या वर्षी पासून मुलांना साहित्य वाटप केले जात आहे. या योजनेर्तंगत विद्यार्थ्यांना निकृष्ट साहित्य पुरविल्याचे प्रकार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी समोर आणला होत्या. त्यानंतर निकृष्ट दप्तरे आणि खोडरबर पुरविणाऱ्या तीन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रशासनाने नोटीसा बजाविल्या आहेत, मात्र असे असतानाही अद्यापही निकृष्ट दर्जाच्या साहित्यांचे वाटप होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. विद्यार्थ्यांना सद्यस्थितीला ही दप्तरे वाटप केली जात आहेत, ती निकृष्ट असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात येत आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बुटांचा प्रशासनाने जो तपशील आणि कंपनी ठरवून दिल आहेत, त्यात विद्यार्थ्यांना विना नाडीचे (लेस) बुट देण्याची अट आहे, मात्र असे असताना काही ठेकेदारांनी नाडी असलेल्या बुटांचे वाटप केले असल्याचे समोर आले. त्यामुळे बुटा प्रमाणेच इतर साहित्यही दिले गेले असल्यास त्याला जबाबदार कोण आणि प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
——–
आमचं काही तरी बघा
महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने हे साहित्य पुरविण्यासाठी 43 दुकानदारांचे पॅनेल तयार केले असून त्यांच्या माध्यमातून पालिकेच्या 287 शाळांमधील 89 हजार मुलांना शालेय साहित्य वाटप सुरू करण्यात आलेले आहे. सुमारे 65 हजार मुलांना वेगवेगळे साहित्य देण्यात आले असले तरी काही शाळांमध्ये अद्यापही काही साहित्य देण्यात आलेले नाही. या शाळां ज्या प्रभागात येतात. त्या प्रभागांमधील नगरसेवकांकडून साहित्य वाटप करणाऱ्या दुकानदारांकडे चिरीमिरी मागितली जात असल्याने हे वाटप बंद असल्याच्या तक्रारी काही दुकानदारांकडून प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.त्याबाबत प्रशासनाकडून सावध भूमिका घेत असले तरी दुकानदार मात्र, खासगीत या नगरसेवकांची नावे सांगत आहेत.
————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)