शालेय विद्यार्थ्यांनी घेतली पोलीस ठाण्याची माहिती

मंचर- आई एज्युकेशनल सोसायटी संचलित न्यू ऑक्‍सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नारायणगाव येथील पोलीस ठाणे, कंट्रोल रुम तसेच सराफा दुकानामध्ये दागिने कसे बनविले जातात याची माहिती घेतली.
पोलीस ठाण्यातील अर्जुन घोडे पाटील, राहुल गोंढे, रमेश इचके व प्रियांका लोंढे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यातील वेगवेगळ्या बंदुकीची माहिती दिली. तसेच त्यांना कंट्रोलरुम दाखविले. ज्वेलर्स शॉपच्या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना सोनार दागिने कसे बनवितात याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मुलांमध्ये देशप्रेमाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना लहान वयातच संस्कार देणे आवश्‍यक आहे, असे मत शाळेच्या संस्थापिका स्वाती मुळे यांनी व्यक्त केले. शाळेचे संचालक देवदत्त निकम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. भेटी दरम्यान मुख्याध्यापिका सुनिता मुजुमदार, शिक्षिका रेशमा वाघ, प्रियांका बाणखेले, सोनाली पारेख उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)