रावसाहेब दानवेंचा शालेय विद्यार्थ्यांच्या वह्यांच्या माध्यमातून प्रचार

जालना : आपल्या प्रचाराठी राजकीय नेते वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी तर शालेय विद्यार्थ्यांच्या वह्यांवरच आपल्या जाहिराती छापल्या आहेत. आपल्या जाहिरातीसाठी शालेय विद्यार्थ्यांच्या वह्या हे माध्यम योग्य आहे का, यावरुन टीकाही होत असली, तरी या कल्पनेची चर्चाही जालना जिल्ह्यात सुरु झाली आहे.

जालना शहरातल्या भाजपच्या कार्यलयात शालेय, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोठ्या वह्यांची विक्री सुरु आहे. कार्यालयाबाहेर लावलेल्या बॅनरवरील माहितीनुसार या वह्या विद्यार्थ्यांना निम्म्या किंमतीत मिळणार आहेत. दानवेंनी या वह्यांची किंमत 18 रुपये प्रति नग, म्हणजेच 216 रुपये डझन अशी ठरवून दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यार्थ्यांना वह्या वाटप करणे किंवा कमी दरात वह्या उपलब्ध करुन देणे, इथवर आपण समजून घेऊ शकतो. मात्र दानवेंनी या वह्यांचा वापर एकप्रकारे राजकीय प्रचारासाठी केला आहे. शालेय, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या कामाचा लेखाजोखा कळावा, या उद्देशाने गेल्या चार वर्षातील कामाची यादीच त्यांनी वह्यांच्या पुठ्ठ्यांवर छापली आहे.
विशेष म्हणजे, रावसाहेब दानवेंनी अशा शे-पाचशे वह्या छापल्या नाहीत, तर तब्बल एक लाख वह्या छापण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)