शालेय विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा

चिंबळी- चिंबळी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी कपाळी गंध, डोक्‍यावर पांढरी टोपी, अंगात पांढरा नेहरू शर्ट व धोतर परिधान केला होता. गळ्यात टाळ व तबला घालून मृदंगाच्या ठेक्‍यावर ताल धरून विठू नामाचा गजर करत गोल व उभे रिंगण धरून हरि नामाचा गजर करत मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. वारकऱ्यांच्या वेशभूषेत पताकाधारी पथकांचा समावेश लक्ष वेधून घेत होता. संपूर्ण गावात दिंडी सोहळ्याचे तसेच वृक्ष व ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यामध्ये झाडे लावा झाडे जगवा, वृक्षवली आम्हा सोयरे, पाणी आडवा पाणी जिरवा असे विविध फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना संदेश दिला. मुख्याध्यापिका वसुंधरा पिरगुंठे यांनी वृक्षाचे व पर्यावरणाचे महत्व सर्व सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)