शालेय मुलांवर अत्याचारप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

यशवंतनगर येथील घटनेने खळबळ

कोपर्डे हवेली  – यशवंतनगर, ता. कराड येथील जि. प. शाळेत अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुख्याध्यापकावर पोक्‍सो अंतर्गत तळबीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दीपावलीच्या सुट्टीनंतर शाळा सुरु झाली. परंतु मुलांनी शाळेत जाण्यास नकार दिल्याने पालकांनी विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार पालकांच्या कानावर घातला.

-Ads-

मुख्याध्यापक बुलुगडे हा अल्पवयीन मुलांना मधल्या सुट्टीत पाणी आणणे, डबा धुणे अशा कारणांनी ऑफिसमध्ये बोलवून अंगाशी लगट करुन मुके घेत, गुदगुल्या करुन लैंगिक शोषण करत व झालेला प्रकार कोणास सांगू नये, म्हणून पैशाचे आमिष दाखवत असल्याचे पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मुख्याध्यापक बुलुगडे याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम, 2012 चे कलम 8, 9 (फ), 9 (ल), 9 (एम) व 11 (2), 12 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कराड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत. जि. प. शाळेत घडलेला प्रकार उघडकीस आल्यामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून सदर शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांमधून होत
आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)