शालेय पोषण आहार संघटनेचे ठिय्या आंदोलन

बॅंक खात्यावर 15 लाख रूपये जमा करा 

सातारा – 
पंतप्रधान साहेब ..निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनानुसार स्वयंपाकी महिलांच्या बॅंक खात्यावर 15 लाख रूपये जमा करा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी शालेय पोषण आहार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. पंतप्रधानांनी 2015 ते 2017 या वर्षात स्वयंपाकी महिलांना दैनंदिन कामासाठी देण्याचे मान्य केले होते. ती रक्कम देखील खात्यावर जमा करावी. त्याचबरोबर किमान वेतन 18 हजार रूपये मिळावा आणि तो पर्यंत साडेसात हजार रूपये मानधन द्यावे.

उन्हाळा व दिपावलीच्या सुट्टीची कपात करण्यात येवू नये. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा मिळाव्यात. शिपाई कम कुक म्हणून नेमणूक करण्यात यावी. 60 वर्षावरील स्वयंपाकी तसेच सर्वांना किमान मासिक 5 हजार रूपये पेंशन देण्यात यावी, अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष कविता उमाप, सुजाता पवार, अर्चना अहिरेकर, गणपतराव साळुंखेंसह संघटनेच्या सदस्या आंदोलनात सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)