शालेय पोषण आहारात लवकरच दूध

पुणे – दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश करण्याच्या अंमलबजावणीला लवकरच सुरुवात होणार आहे. याबाबतची प्रक्रिया अंतीम टप्यात असल्याचे राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.

दुधाला मागणी नसल्यामुळे दर मिळत नाही, परिणामी दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. हे लक्षात घेऊन राज्यातील शाळांमध्ये दुपारच्या जेवणात दुधाचे वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आठवड्यातील पाच दिवस प्रत्येक विद्यार्थ्याला दोनशे ग्रॅम दूध मिळणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू केली असून या योजना अंतीम टप्यात आहे.याबाबतची अंमलबजावणी ही लवकरच सुरू होईल, असेही जानकर यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)