शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी उद्योजकता जोपासावी !

उद्योजक नितीन बनकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
निगडी – मातृृृृभाषेतून शिक्षण घेताना मुलांनी इंग्रजी या जागतिक भाषेचा देखील उत्तम अभ्यास केला पाहिजे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी उद्योजकता जोपासावी, असे प्रतिपादन शहरातील प्रख्यात उद्योजक आणि पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष नितीन बनकर यांनी केले.
रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजा शिवछत्रपती प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून बनकर बोलत होते. यावेळी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, अभंग, कीर्तन, पोवाडा, नाटिका असे विविध कार्यक्रम सादर करत गुणदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपत भालेकर आणि स्वागताध्यक्षस्थानी रमेश जाधव उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक नितिन बनकर, देहुरोड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शाहिद पठाण, उपनिरिक्षक संतोष येडे, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेविका संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, स्विकृत नगरसदस्य पांडुरंग भालेकर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संदीप चव्हाण, रवींद्र सोनवणे, संभाजी हगवणे, एस. प्रयास फाउंडेशनचे सुशील शिंगाडे, दिप्ती बंदिसोडे, संस्थेचे अध्यक्ष धनाजी भालेकर, कार्याध्यक्ष शांताराम भालेकर, सचिव भागवत चौधरी, खजिनदार दशरथ जगताप, सुधाकर दळवी, सूर्यकांत भसे, माजी विद्यार्थी बळीराम येळवंडे, निलम काळोखे, मुख्याध्यापक गोवर्धन चौधरी, माधुरी राऊत आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक गोवर्धन चौधरी यांनी केले. माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्‍त करत शाळेविषयी कृतज्ञता व्यक्‍त केली. याप्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी नितिन बनकर यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून उद्योजकता जोपासावी तसेच मातृभाषेतून शिक्षण घेताना जागतिक भाषा असलेल्या इंग्रजीवर प्रभुत्व निर्माण करावे असे प्रतिपादन मार्गदर्शनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्‍तीपर गीते, भजन, पोवाडे, लोकगीते, इत्यादी सादर करत विविध गुणदर्शन केले. मुलांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांना पालकांनी भरभरुन दाद दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)