शालेय आहारात अंड्यांचा समावेश करणार : महादेव जानकर

जागतिक अंडी दिनानिमित्त कार्यक्रम

पुणे – आंध्रप्रदेश आणि तेलगंणा राज्यांमध्ये शालेय पोषण आहारात अंड्याचा समावेश आहे. त्याच धर्तीवर राज्यातही शालेय पोषण आहारात अंड्याचा समावेश करण्याचा प्रयत्न असल्याचे राज्याचे पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्‍त केले.

जागतिक अंडीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार साबळे, पशुसंवर्धन आयुक्‍त कांतीलाल उमाप, अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. डी. एम. चव्हाण, सहआयुक्‍त डॉ. धनंजय परकाळे, डॉ. गीता धर्मट्टी, डॉ. प्रसन्न पेडगावकर, भाऊसाहेब ढोरे, सचिन काकडे, संजय शेडगे आदी उपस्थित होते.

पशुसंवर्धन मंत्री जानकर म्हणाले, पोषणाच्या बाबतीत आईच्या दुधानंतर अंड्यामधील प्रथिनांचा क्रमांक लागतो. अंड्यातील प्रथिने ही दूध व मांस यापेक्षा पचनास हलकी असतात आणि सर्व वयोगटातील लोकांना सहज पचतात. राज्यामध्ये सध्या दीड कोटी अंडी उत्पादन होते. राज्याची अंड्यांची गरज तीन कोटींची आहे, उर्वरित अंडी आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्याकडून विकत घेतली जातात. राज्यामध्येच अंडी उत्पादन वाढविण्याची मोठी संधी असून शेतकऱ्यांनी कुक्‍कुट पालनाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. पशुसंवर्धन, कुक्‍कुटपालन या व्यवसायामध्ये हे उत्पन्न चारपट करण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार अमर साबळे यांनी खाण्यामध्ये अंड्यांचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा व्यक्‍त केली. कुक्‍कुटपालन, सेंद्रीय खाद्य निर्मिती, विक्री व्यवस्थापन याचे नियोजन केल्यास अंडीविक्रीसाठी जागतिक बाजारपेठ खुली असल्याचे सांगितले. अरब देशांचे इंडो-अरब फोरम लवकरच स्थापन करण्यात येणार असून त्या माध्यमातून 28 देशांमध्ये अंड्यांची जास्तीतजास्त विक्री होऊ शकते, असेही ते म्हणाले.

आयुक्‍त कांतीलाल उमाप यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. गीता धर्मट्टी यांनी पोषण आहारातील अंड्यांचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. प्रसन्न पेडगावकर, भाऊसाहेब ढोरे, सचिन काकडे, संजय शेडगे यांनीही आपले मनोगत व्यक्‍त केले. सूत्रसंचालन आशीष जराड यांनी तर, डॉ. डी. एम. चव्हाण यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
7 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)