शार्क टीथ कसे येतात? (भाग दोन)

 उपचार प्रक्रिया

उपचारांची पहिली पायरी म्हणजे, शार्क टीथ उगवण्याचे मूळ कारण समजून घेणे. बाळाचे दुधाचे दात पडण्याची प्रक्रिया लांबण्यामागचे नेमके कारण दंतवैद्यकशास्त्रीय चिकित्सा किंवा क्ष-किरण तपासणीतून कळू शकते. समजा, समोरचा एक दात शार्क टूथ असेल तर दुसराही त्याच पद्धतीने येण्याची शक्‍यता असते. अशा घटनांमध्ये, बाळाचे दुधाचे दात काढून टाकण्यापूर्वी दोन्ही नवे दात उगवण्याची वाट पाहणेच डॉक्‍टर पसंत करतात.

-Ads-

दोन्ही दात काढून टाकण्याच्या प्रक्रियेपेक्षा, लहान मुलांसाठी वाट पाहण्याची क्रिया फरच सुखावह व सोपी ठरते. दातांची निसर्गत: रचनाच चुकीची असल्यामुळे लहान मुलांमध्ये योग्य वेळी योग्य दात न पडण्याच्या समस्या निर्माण होतात.काही मुलांच्या बाबतीत बरेच प्राथमिक दात पडत नसतील, तर दात काढण्याची मालिकाच योजावी लागते. या प्रक्रियेदरम्यान, नंतर येणारे कायमस्वरूपी दात योग्य ठिकाणी उगवावेत यासाठी, काही निवडक दुधाचे दातच लवकर काढून टाकले जातात.

प्राथमिक दात निसर्गत: पडले नसल्याने आणि नवीन दात त्याठिकाणी योग्य वेळेत व योग्य ठिकाणी न आल्याने काही कायमस्वरूपी दातांवर कायमचा परिणाम होण्याचीही दाट शक्‍यता असते. अशा मुलांच्या बाबतीत, ऑथोर्डोटिक उपकरणांच्या मदतीने, शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरूपी दातांना योग्य जागेवर आणणे आवश्‍यक असते.

यावर उपचार घ्यावेत, की घेऊच नयेत?

शार्क टीथ असलेल्या बहुतांश मुलांना कोणत्याही उपचारांची आवश्‍यकता भासत नाही. नवीन दात उगवल्यानंतर, कालांतराने जुना, बाळ दात किंवा दुधाचा दात आपोआप क्षीण होतो आणि पडतो. बरीचशी मुले या क्षीण झालेल्या दातांशी जिभेने किंवा हाताने चाळे करतात आणि परिणामी तो दात आणखी सैल होऊन पडण्यास मदत होते. जर ही प्रक्रियाच क्षीण किंवा उशिराने होत गेली, तर मात्र बाळाचे नवीन दात दुधाच्या दातांच्या मागच्या बाजूला वाढू लागतात.

काही वेळा दुधाचे दात असतील त्याच जागी भक्कमपणे टिकून राहतात. त्या दातामागे नवीन दातही येतो; परंतु दुधाचा दात पडण्यासाठी, त्याची मुळे क्षीण होतील असा कोणताही दाब निर्माणच होत नाही. अशा बाबतीत, दुधाचे दात उपचारांमार्फत काढून टाकावे लागतात. परिणामी, नवीन दात कालांतराने आपोआप सुयोग्य जागा घेतो. हा काळ काही मुलांच्या बाबतीत काही आठवड्यांचा असतो, तर काहींच्या बाबतीत काही महिने लागू शकतात.

     डॉ. राजेंद्र माने


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)