शारीरिक, मानसिक रुग्णांवर डान्स थेरपीद्वारे उपचार

पुणे – डान्स थेरपी आरोग्य विज्ञानासह कलेच्या उपचारात्मक मूल्यांचे एकत्रीकरण करते. कला आणि सर्जनशीलता व वैद्यकिय शास्त्रांचा सर्वोत्तम मेळ असलेला हा कार्यक्रम आहे. शारीरिक आणि मानसिक रुग्णांवर उपचाराकरिता हेल्थकेअर प्रोफेशनल्सना हे एक नविन साधन असेल, असे मत लाईफ अँड डान्स या डान्स व मूव्हमेंट थेरपी अकॅडमीच्या डॉ. निकिता मित्तल यांनी व्यक्त केले.

हेल्थकेअर सध्या जगातील सर्वात क्‍लिष्ट, गतिमान आणि जलदगतीने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. पर्यायी थेरपीच्या प्रकारात भर घालत संचेती हॉस्पिटलने डॉ. निकिता मित्तल यांच्या वतीने डान्स मुव्हमेंट थेरपी हा सर्टिफीकेट कोर्स सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम न्युयॉर्क स्थित संलग्न आहे. या कोर्सचे उद्‌घाटन गुरूवारी (दि. 10) झाले. याप्रसंगी पत्रकारांशी त्या बोलत होत्या. “डान्स मूव्हमेंट थेरपी’मध्ये भावनिक, संज्ञानात्मक, शारीरिक आणि सामाजिक एकात्मता वाढविण्यासाठी शारीरिक हालचालींचा सायकोथेराप्युटिक वापर केला जातो. “डीएमटी’ ही मानसिक आरोग्याकडे एक समग्र दृष्टिकोणाने पाहणारी थेरपी आहे. जी शारीरिक, संज्ञानात्मक, भावनिक आणि सामाजिक विकासाचे तांत्रिक ज्ञान वापरते. जागतिक संशोधनाद्वारे समर्थित कलेक्‍टिव्ह डान्स मूव्हमेंट थेरपी शरीर, मन, आणि आत्मा एकीकरणासाठी मदत करते, अशी माहिती हेल्थकेअर अकॅडमीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा सांघवी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)