शारदीय व्याख्यानमालेतून विचारांचा जागर : स्मिता पवार

तारगाव : येथील शारदीय व्याख्यानमालेचे उद्‌घाटन करताना तहसीलदार स्मीता पवार, बाबासो परीट, भिमराव पाटील आणासो निकम

रहिमतपूर, दि. 11 (प्रतिनिधी) – ग्रामीण भागात असूनही तारगाव येथील शारदीय व्याख्यानमाला वैचारिक उंची गाठणारी आहे. गेली पंचवीस वर्ष हा विचारांचा जागर पंचक्रोशीतील साहित्य प्रेमींना वैचारिक खाद्य पुरवणारा आहे. या व्याख्यानमालेचे उद्‌घाटन माझ्या हस्ते होत आहे हे माझे खूप मोठे भाग्य आहे. श्रीतारकेश्वर दुर्गा उत्सव मंडळाने जपलेली परंपरा अखंड कायम रहावी, असे प्रतिपादन कोरेगावच्या तहसिलदार स्मिता पवार यांनी केले.
तारगाव, ता. कोरेगाव येथील नवरात्रोतसवानिमित्त आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे उद्‌घाटन करताना त्या बोलत होत्या. जि. प. सदस्य भिमराव पाटील, पंचायत समिती सदस्य आण्णासो निकम, व्याख्याते बाबासो परीट, मंडळाच्या अध्यक्षा शोभा देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
या व्याख्यानमालेत दररोज भिमराव धुलूभूलू, ले. कर्नल सुरेश पाटील, वैद्य सुविनय दामले, रोहिणी माने-परांजपे, शिवमती सुनंदाताई भोस, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. शिवरत्न शेटे या नामवंत व्याख्यात्यांचे हरवत चाललेला संवाद, भारत पाक युद्ध 1971, स्त्रीशक्ती आणि आयुर्वेद, किर्तन, राजमाता जिजाऊ साहेब, महाराष्ट्राची सांस्कृतिक वाटचाल, असे होते शंभुराजे या विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानचा फायदा पंचक्रोशीतील ग्रामंस्थांनी घ्यावा, असे आवाहन वीरशैव लिंगायत समाज अध्यक्ष रत्नाकर शेटे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)