“शारदा वॉरिअर्स’ शारदा चषकाचा मानकरी

पारनेर – सर्वज्ञ युवा प्रतिष्ठान व झुंजार क्रिकेट क्‍लबच्या वतीने आयोजित शारदा चषक क्रिकेट स्पर्धेत काटाळवेढा येथील शारदा वॉरिअर्स संघ 51 हजार रुपये आणि चषकाचा मानकरी ठरला.

झुंजार स्पोर्टस्‌ क्‍लबला 41 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. दत्त इलेव्हन (अकलापूर ) संघाला तिसरे 31 हजारांचे, तर सर्वज्ञ नाईट रायडर्स संघाला चौथे25 हजारांचे बक्षीस देण्यात आले. मयूर अंभोरे मालिकावीर, तर अमोल दुबे सामनावीर ठरला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून योगेश पवार याने लक्षवेधी कामगिरी केली. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रियाज रजपूतचा सन्मान करण्यात आला. काशिनाथ दाते, राजू भंडारी, जिल्हा परिषद सदस्य माधव लामखडे, शिवाजी बेलकर, भाऊसाहेब भाईक, जालिंदर आहेर, गोवर्धन गुंड, सोपान भाईक यांच्या वतीने विजेत्या संघांना बक्षिसे देण्यात आली. पुनित खन्ना, रविकिरण डोंगरे, प्रशांत दाते, पीयूष गाजरे, संतोष पवार, दत्ता भाईक, बाळू गुंड, संभाजी भाईक , गोविंद गुंड, युवराज भाईक, सुभाष भाईक , नितीन गाजरे, सुदर्शन खटाटेयांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)