शारदा ग्राम आरोग्य संजीवनी योजनेंतर्गत आरोग्य शिबिर

लोणी काळभोर- आज केवळ उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून सर्वसामान्याच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. लोकाभिमुख आरोग्यसेवा व सर्वसामान्यांना परवडतील असे दर तसेच गरीब व गरजूंना चांगल्या वैद्यकीय सुविधा मोफत मिळाव्यात यांकरीता महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महात्मा फुले जन आरोग्य योजना जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयात सुरू व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यानी केले. पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, लोणी स्टेशन (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हवेली पंचायत समिती आयोजित शारदा ग्राम आरोग्य संजीवनी योजना 2018-19 अंतर्गत मोफत सर्वरोग निदान, तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी जिल्हाध्यक्ष गारटकर बोलत होते. यावेळी माजी आमदार अशोक पवार, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, डॉ. आदिती कराड, डॉ. आशिषकुमार दोशी, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने, समाज कल्याण सभापती सुरेखा चौरे, जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, अर्चना कामठे, हवेली पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, सदस्य युुुगंधर काळभोर, अनिल टिळेकर, कावेरी कुंजीर, हेमलता बडेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष नंदू काळभोर, जिल्हा सरचिटणीस दिलीप वाल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)