शारदा गजाननाची मिरवणूक हलत्या झोपाळ्यावरून

पुणे – अखिल मंडई मंडळाचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असून यंदा शारदा गजाननाची मिरवणूक ही हलत्या झोपाळ्यावरून निघणार आहे. इतिहासात प्रथमच शिवशौर्य रथावर हलत्या झोपाळ्यावर शारदा गजानन विराजमान होणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी ही माहिती दिली.

शिवशौर्य रथ 14 फूट बाय 18 फूट असून त्याची उंची 30 फूट आहे. रथावर हनुमान, देवतांचा सेनापती, कार्तिकेय, नंदी, मूषक यांच्या मूर्ती असणार आहेत. यामध्ये हनुमानाची मूर्ती 11 फूट असून इतर मूर्ती नऊ फूट उंचीच्या असणार आहेत. रथामध्ये शंकराची मूर्ती न वापरता त्याच्या शौर्याची प्रतिके वापरली आहेत. महाभारतातील युद्धाच्या रथाप्रमाणे या रथाचे स्वरूप असणार आहे. या रथाची संकल्पना शिल्पकार विशाल ताजणेकर यांची आहे.

-Ads-

शिवगर्जना, नूमवि, गजर ही ढोल-ताशा पथके आणि न्यू गंधर्व बॅन्ड मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. जयंत नगरकरांचा नगारा मिरवणुकीत अग्रभागी असणार आहे. खळदकर बंधू यांचे सनईवादन होणार आहे.

मिरवणूक संध्याकाळी सहा वाजता निघणार आहे. मुख्य उत्सव मंडप ते मुख्य मिरवणुकीत सहभागी होईपर्यंत पोलिसांनी रस्ता मोकळा करून द्यावा, अशी विनंती दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना करण्यात आल्याचे थोरात म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)