शामगावच्या उपसरपंचपदी रुपाली जाधव बिनविरोध

कराड – शामगाव, ता. कराड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपाली जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपसरपंच संजय कुंभार यांनी राजिनामा दिल्याने हे पद रिक्त झालेले होते.
शामगावची ग्रामपंचायत निवडणूक तिरंगी झाली होती. यामध्ये सत्तेचे त्रांगडे झाले होते. राष्ट्रीय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी

कॉंग्रेसने एकत्रित येवून सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे भाजपाला विरोधी बाकावर बसावे लागले होते. लोकनियुक्त सरपंच म्हणून कॉंग्रेसच्या शितल गायकवाड या निवडून आल्या होत्या. पहिल्या अडीच वर्षाचा उपसरपंचपदाचा मान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संजय कुंभार यांना मिळाला होता. त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उपसरपंच पदाचा मान कॉंग्रेसच्या रुपाली जाधव यांना मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपसरपंच निवडीवेळी पं. स. माजी सदस्य भिमराव डांगे, धोडिराम पोळ, सरपंच शितल गायकवाड, ग्रामसेवक कांबळे, शिवाजी पाटील, शंकर पोळ, संजय कुंभार, युवराज पोळ, विजय पाटोळे, बापुराव पोळ, रमेश गायकवाड, सुनिल गायकवाड, आशाताई डांगे, शालन पोळ, गणेश पोळ, राजू पोळ, सुरेश चव्हाण, प्रदीप पोळ यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित उपसरपंच रुपाली जाधव यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)