शानदार समारंभाने ‘इफ्फी 2018’ची गोव्यात सांगता

पणजी – गोव्यात 20 तारखेपासून रंगलेल्या 49 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शानदार समारंभाने आज सांगता झाली. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, गोव्याचे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, समारंभाचे प्रमुख पाहुणे अनिल कपूर यांच्या उपस्थितीत संगीत आणि नृत्य अविष्काराने या सोहळ्याची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राज्यवर्धन राठोड यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करत या महोत्सवासाठीचे ज्युरी, चित्रपट निर्माते, उपस्थित प्रतिनिधी, आयोजक आणि गोव्यातल्या जनतेचेही आभार मानले. चित्रपट हा भाषेपलिकडे असतो. इफ्फीमध्ये सादर झालेल्या चित्रपटातून स्फूर्ती मिळाली. या चित्रपटांनी मनोरंजन केले, असे ते म्हणाले. पुढचे वर्ष इफ्फीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यासाठी कल्पना सुचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

चित्रपट हे वास्तवाचे दर्शन घडवून समाजाला परावर्तीत करतो. ‘टॉयलेट’ आणि ‘पॅडमॅन’सारखे चित्रपट समाजातील विविध समस्यांचे निराकरणासाठी मदतपूर्ण ठरतात. जेव्हापासून गोवा हे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कायमचे ठिकाण ठरले त्या 2004 सालापासून ते आजपर्यंत गोव्याच्या पायाभूत सुविधांमध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. इफ्फीसाठी परदेशातूनही मोठी प्रतिनिधी मंडळं आली आहेत. ही बाब नमूद करत भारतीय चित्रपटांचा मोठा प्रभाव असल्याचे केंद्रीय मंत्री अल्फोन्स यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे म्हणाले की, भारताच्या प्रत्येक क्षेत्राच्या सांस्कृतिक, भौगोलिक वातावरणासंबंधी, तेथील समस्या लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेषतत्वाने चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

इफ्फीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद बघता, आणि पुढील वर्षीच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवाचे इफ्फीचे उद्दिष्ट ठेवून गोव्यात चित्रपटगृहांच्या संख्येत वाढ, चित्रपटांची संख्या वाढवण्यासह पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)