शातांई स्कुलमध्ये गणित-विज्ञान प्रदर्शन

चिंबळी- चिंबळीफाटा येथील शातांई मेमोरियल स्कुलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांच्या गणित-विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती मुख्याध्यापिका प्रियंका अटोळे यांनी दिली. या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विविध प्रकल्प सादर करून त्याबाबतची माहिती सांगितली. यात सौर ऊर्जा, पवन चक्की, आकाश गंगा अशा अनेक विषयांवर प्रकल्प सादर केले होते. या प्रदर्शनाला स्वाती जैद व सर्व शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले केले. तर पालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने संस्थापक अध्यक्ष अनुराग जैद व उदोजक संजय जैद यांनी सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गाचे कौतुक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)