यंदाच्या वर्षी देखील मंडळांच्या मोठ्या आकाराच्या गणेशमुर्त्या
घरगुती शाडुच्या मुर्त्याच पाहिजेत सातारकरांची स्टॉल वाल्यांना मागणी…
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला असल्याने सातारा मधील मुर्तीकारांची गडबड सुरु झाली आहे . पर्यावरण पूरक गणेशोत्स साजरा करण्याचे सातारकरांनी ठरवल्याने घरगुती बसविण्यात येणार्या शाडूच्या मुर्त्यांना मोठया प्रमाणात मागणी आहे. शहरातील विविध ठिकाणी गणेशमुर्ती विक्रीचे स्टॉल लागण्यास प्रारंभ झाला आहे. इथे सातारकर आवर्जून शाडूच्याच मुर्त्यांची मागणी करत आहेत. सातारा गडकर आळी येथील कुंभारवाड्यामध्ये गणेशमुर्ती बनविण्याचा कारखाना आहे. या मध्ये सातारा शहरातील तसेच जिल्हयातील गणेशमंडळांच्या मुर्ती बनण्याचे काम अनेक वर्षापासून केले जाते. कुंभारआळी मध्ये आकर्षक व विविध स्वरूपातील मागणी प्रमाणे गणेशमुर्ती बनविण्याचा येथील मुर्तीकारांचा हातखंडा आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील 21 ते 18 फुटापर्यतच्या मोठया आकाराच्या गणेशमुर्ती बनविल्या जात आहेत. मागणी नुसारच आम्ही गणेशमुर्त्या बनवितो असे येथील मुर्तीकारांचे म्हणणे आहे. अत्तापर्यंत मुर्त्यांबनविण्याचे एकुण सत्तर टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामात मुर्तीकार मग्न झाले आहेत. गणेशमुर्तींच्या किमती पंधरा टक्याने वाढ झाली आहे. तरी मंडळांच्या कार्यकर्त्यांची मोठया मुर्त्याबनविण्याची मागणी काही कमी होत नाही.
मुर्तींच्या उंची बाबत सातारा जिल्हाप्रशासनाने कोणत्याही पूर्वसूचना मुर्तीकारांना दिल्या नाही त्यामूळे मोठया आकाराच्या मुर्त्यांची निर्मीती केली जात आहे. मुर्तींच्या आकाराचे नियोजन खरे तर एक वर्षाअगोदरच करणे आवश्यक होते. तसेच मंडळांनी मुर्तीच्या उंची बाबत आणि पर्यावरण पूरक गणेशमुर्ती बद्दल स्वयंशिस्त पाळली पाहिजे. तसेच घरगुती शाडूच्या गणेशमुर्त्यांच बसविण्याचा आग्रह धरला पाहिजे.सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे गणेशविसर्जन मिरवणूक सोहळयाबाबत वाहतुकव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मोठया आकाराच्या मुर्तीमूळे प्रशासनाला व मंडळांना ही गणेश मिरवणूकचे आव्हान ठरणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव साजराकरणार्या गणेशमंडळाची तयारीची लगबग सुरू असली तरी यावर्षी निधी गोळा करण्यासाठी गणेश मंडळांना धर्मादाय आयुक्तालयाची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याकरिता येत्या ऑगस्टपासून ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर आयुक्तालयाची संकलनासाठी परवानगी दिली जाणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या गणेश उत्सवात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात येणार असून, नियम भंग करणार्या मंडळांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल .
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा