शाडूच्या मूर्ती वाटपाने गणेशोत्सवाची सुरुवात

 

कामशेत,“आपला बाप्पा आपणच बनवू या, पर्यावरण वाचवू या’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी सकाळी पोलीस ठाणे ते गणेश मंगल कार्यालय अशी जनजागृती फेरीत प्लास्टिक मुक्‍त, इको फ्रेंडली, पर्यावरण वाचवा अशा घोषणा दिल्या. शिबिरात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या इको फ्रेंडली शाडू मातीच्या मूर्तीचे वाटप वडगाव नगर पंचायतचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केले. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.

पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शेवाळे, सरपंच सारिका घोलप, पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप, लायन्स क्‍लब कामशेतचे अध्यक्ष मनोज जैन, राजू अगरवाल, उद्योजक सुनील भटेवरा, नगरसेवक राजेंद्र कुडे, विशाल वाहिले, रवींद्र गायकवाड, महेश शेट्टी, विवेक सहस्त्रबुद्धे यावेळी उपस्थित होते.

इंद्रायणीचे प्रदूषण टाळण्यासाठी कामशेतमध्ये प्रथमच इको फ्रेंडली गणेश मूर्तीचे प्रशिक्षण दोन टप्प्यांत देण्यात आले. शहरातील जैन इंग्लिश स्कूल, पंडित नेहरू विद्यालय, सुमन रमेश तुलसियानी हायस्कूल, वनवासी आश्रम शाळांमधील 84 विद्यार्थी व विद्यार्थीनींनी शिबिरात शाडूच्या मूर्ती करून त्यांना नैसर्गिक रंग देण्यात भाग घेतला. शिक्षक अतिष थोरात यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.

आर्ट इव्होल्यूशन डान्स ऍकॅडमीच्या गणेश वंदनेने गणेश मूर्ती वाटपाची सुरुवात झाली. राम कानगुडे व सुनील भटेवरा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप व व्याख्याते सोमनाथ गोडसे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. मयूर ढोरे, दत्तात्रय शेवाळे, सुनील भटेवरा, मनोज जैन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्राचार्य तनुश्री शुक्‍ला, श्रद्धा बजारे, नागेश माहुले, अनिता देवरे, शिक्षक श्रद्धा घाटपांडे, माधवी टाकळकर, खैरनार, वाजे, भागुजी कदम, लक्ष्मण शेलार, काशिनाथ येवले, शैलेश बोथरा यांना मानचिन्ह देवून यावेळी विशेष सत्कार केला. सहदेव केदारी, सचिन शेडगे, चेतन वाघमारे, किशोर ढोरे, आदेश कोंढरे, संतोष वीर, भरत शिंदे, किरण चिमटे यांचा शिबीर यशस्वी केल्याने मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

गणेश मूर्ती प्रशिक्षण शिबिरात प्रथम क्रमांक प्रज्वल केदारी, द्वितीय क्रमांक दीपक गोस्वामी, तृतीय नील पटेल यांनी पटकावला. दीप्ती गौड व दिव्या चिमटे यांना उत्तेजनार्थ बक्षीस दिले. सर्व विजेत्यांना मानचिन्ह व पुष्पगुच्छ देण्यात आला. शिबिरात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले. बाळासाहेब शिरसट, सोमनाथ शिंदे, तानाजी दाभाडे, मोहन वाघमारे, राजाराम धावडे, राजन परदेशी, रोहिदास वाळूंज यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)