शाडूच्या मळ्यातील प्रश्‍न “जैसे थे’

श्रीगोंदा – श्रीगोंदा शहरातील प्रभाग क्र. 4 मधील वसुंधरा वसाहतीपाठोपाठ आता प्रभाग क्र. 2 मधील शाडूच्या मळ्यातील नागरिकांनी ही मतदानावर बहिष्कार टाकला आहे. मूलभूत सुविधांपासून हा भाग वंचित असून वर्षानुवर्षे येथील प्रश्‍न जैसे थेच आहे. नागरी सुविधाच मिळत नसेल तर मतदान करायचं कशासाठी असे संतप्त मत व्यक्‍त करीत येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

दि. 27 जानेवारीला येथील नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. संत शेख महंमद महाराज प्रभाग क्र. 4 मधील वसुंधरा लेन मधील नागरिकांनी काही दिवसांपूर्वीच मतदानावर बहिष्कार टाकल्याचा निर्णय जाहीर केला आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांचा निषेध नोंदवत मत मागण्यास कोणी येऊ नये, असा फलक लावण्यात आला आहे. या घटनेची चर्चा पूर्ण शहरात झाली होती. याचीच पुनरावृत्ती लक्ष्मीनगर प्रभाग क्र. 2 मधील शाडूच्या मळ्यात झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या भागात अनेक वर्षांपासून रस्ते नाही, पाण्याची सोय नाही, एक कूपनलिका आहे. ती सुद्धा बंद अवस्थेत, कचऱ्याची गाडी या भागात अद्याप गेलेली नाही, येथे कचराकुंडीत नाही, हे या प्रश्‍नांचे भिजते घोंगडे गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. आजी-माजी नगरसेवकांनी या भागात कधी लक्ष दिले नाही. हे राजकीय पदाधिकारी पाच वर्षातून एकदा फक्‍त मतासाठी आमच्याकडे येतात. नागरी समस्यांनी आम्ही त्रस्त झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे येथील महिलांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)