शाकंबरी पतसंस्थेतील गैरव्यवहारांची चौकशी करा

  • बारामती जिल्ह्या न्यायालयाचे न्यायाधीश देशपांडे यांचे पोलिसांना आदेश

जळोची – बारामती येथील श्री शाकंबरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश बारामती जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आर. बी. देशपांडे यांनी दिले आहेत.
दिलीप विलास गजरे यांनी याबाबत फौजदारी खटला दाखल केला आहे. दिलीप गिजरे यांचे वडील निवृत्त झाल्यावर त्यांचे आलेल्या फंडाची व घर विक्रीची रक्कम त्यांनी त्यांचे कुटूंबीयांचे नावे श्री शाकंबरी पतसंस्थेमध्ये ठेव म्हणून रक्क्‌म 46 हजार व बचत खात्यामध्ये 1 लाख 36 हजार 917 इतकी रक्कम ठेवली आहे. ठेवीची मुदत संपल्यावर फिर्यादी व त्यांचे कुटूंबीयांनी त्यांच्या परताव्याची वेळोवेळी मागणी केली; परंतु पतसंस्थेने रक्कम न दिल्याने फिर्यादी यांनी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल बबनराव गलांडे, सदस्य लता फत्तेसिंह दरेकर, मिना अशोक शिळवणे, सुखदेव पांडुरंग हेगडे, सिंधूताई भा.म्हेत्रे, रोहिणी रत्नाकर खटावकर, बाळासाहेब आनंदराव ढोबळे, बाळासाहेब रामचंद्र शेलार, किशोर भारत बगाडे, विलास नागेश माने यांच्या विरुद्ध सहायक निबंधक सहकारी संस्थेकडे तक्रारी दिल्या; परंतु त्यांची कोणीही दखल घेतली नाही. नंतर फिर्यादी हे बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले, तेथे ही त्यांची तक्रार घेतली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी बारामती जिल्हा न्यायालय महा. ठेविदारांचे हितसंबंध संरक्षक कायदा कलम 3, 4 व भा.द.वि.कलम 409,120 (ब) प्रमाणे ऍड. धनंजय विंचू यांच्या मार्फत फिर्याद दाखल केली. त्यानंतर न्यायालयामध्ये आर.बी.देशपांडे यांचे समोर सुनावणी झाली. तिथे बाजू ऐकून घेतल्यानंटर शाकंबरी पतसंस्था व त्यांचे अध्यक्ष व संचालक मंडळ विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश बारामती शहर पोलिसांना देऊन त्याची चौकशी करुन अहवाल 27 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयात दाखल करण्याचा आदेश केला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)