शाओमीचा “मेक इन इंडिया’वर भर

नवी दिल्ली – उत्पादन क्षमता मजबूत करण्यासाठी शाओमी या स्मार्टफोन कंपनीने देशात तीन नवीन प्रकल्प सुरू केल्याची घोषणा केली. यामध्ये सरफेस माऊन्ट टेक्‍नोलॉजीच्या प्रकल्पाचा समावेश आहे. देशातच प्रिन्टेट सर्किट बार्ड असेंब्ली करत उत्पादन घेण्याचा कंपनीचा हेतू आहे. स्थानिक पातळीवर सुट्या भागांची निर्मिती करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

फॉक्‍सकॉन या कंपनीच्या भागीदाराबरोबर उत्पादन घेण्यात येणार आहे. 2018 च्या तिसऱ्या तिमाहीपासून प्रन्टेट सर्किट बोर्डचे उत्पादन घेण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीसिटी आणि तामिळनाडूतील श्रीपेरंबदुरमध्ये हे प्रकल्प आहेत. याव्यतिरिक्‍त उत्तर प्रदेशातील नोयडामध्ये स्मार्टफोनचे उत्पादन घेण्यात येते. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्मार्टफोनचे सुटे भाग बनविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. यासाठी 2.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार असून 50 हजार रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल. पंतप्रधान मोदी यांच्या मेक इन इंडिया या महत्त्वाकांक्षी उपक्रमास हातभार लागण्यास मदत होईल. सध्या शाओमीच्या प्रकल्पामध्ये 10 हजारपेक्षा अधिक कर्मचारी असून त्यामध्ये महिलांची संख्या 95 टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)