शांती सेनेतील सहभागी देशांची देणी वेळेवर द्या – भारत

भारताची संयुक्तराष्ट्रांमध्ये मागणी
संयुक्तराष्ट्रे – संयुक्तराष्ट्रांतर्फे जगभरात अनेक ठिकाणी शांतीसेैन्य पाठवले जाते. त्यासाठी अनेक देशांकडून लष्करी मनुष्यबळ पुरवले जाते पण त्याचा आर्थिक मोबदला वेळेवर दिला जात नाही. त्याचा विपरीत परिणाम शांती सैन्याला कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ पाठवण्यावर होत असून संयुक्तराष्ट्रांनी संबंधीत देशांना हा आर्थिक मोबदला वेळेवर दिला पाहिजे अशी मागणी भारताकडून करण्यात आली आहे.

भारताचे संयुक्तराष्ट्रांमधील कायम प्रतिनीधी महेश शर्मा यांनी सांगितले की या शांती दलाला अत्यंत विपरीत परिस्थितीत काम करावे लागते. त्यांच्यापुढील आव्हानेही बिकट असतात. त्यामुळे शस्त्रसज्ज आणि कुशल मनुष्यबळ पुरवण्याची मागणी संबंधीत देशांकडे संयुक्‍त राष्ट्रांकडून केली जाते पण त्याच्या संबंधात जो मोबदला दिला जातो तो मात्र वेळेवर दिला जात नाही.

शांती कार्याच्या अर्थकारणाविषयीच्या चर्चेत भाग घेताना त्यांनी ही मागणी केली. गेल्या वर्षीच्या 31 मार्चच्या हिशोबानुसार संयुक्तराष्ट्रांनी संबंधीत देशांना एकूण 777 दशलक्ष डॉलर्स देणे बाकी होते. त्यापैकी 77 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम भारताला येणे आहे. ज्यांची सर्वाधिक देणी संयुक्तराष्ट्रांनी थकवली आहे त्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने संयुक्तराष्ट्रांच्या 50 मोहिमांसाठी एकूण दोन लाख लष्करी मनुष्यबळ पुरवले आहे. त्यापैकी 168 जणांनी या मोहीमांसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे असे शर्मा म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)