शांतीभूषण यांच्या ‘त्या’ याचिकेवर निकाल लवकरच

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील कार्यपद्धती बदलण्याची मागणी करणाऱ्या ज्येष्ठ विधीज्ञ शांतीभूषण यांच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या याचिकेवर नुकतीच सुनावणी पूर्ण झाली. यावेळी केंद्र सरकारची बाजू महाधिवक्ता वेणुगोपाल यांनी मांडली.

सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांचे वितरण विविध न्यायाधीश आणि पीठांना करण्याचा सर्वाधिकार सरन्यायाधीशांना असू नये. या कामासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांची समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने निर्णय घ्यावा, अशी सूचना या याचिकेत करण्यात आली आहे. तथापि, केंद्र सरकारच्या वतीने या सूचनेला विरोध करण्यात आला. वितरणाचे कार्य समितीकडे सोपविल्यास प्रचंड गोंधळ निर्माण होणार आहे. समितीत एकमत न झाल्यास अंतिम निर्णय कोण घेणार हा प्रश्नही महत्वाचा आहे. समितीने बहुमताच्या आधारावर निर्णय घेण्याचा पायंडा पाडल्यास गटतट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समिती स्थापन करून समस्या सुटण्याऐवजी अधिकच जटील होईल, असे अनेक मुद्दे वेणुगोपाल यांनी मांडले.

-Ads-

ही याचिका प्रथम न्या. चलमेश्वर यांच्या पीठापुढे आली होती. तथापि, चलमेश्वर यांनी सुनावणी करण्यास नकार दिला. आता ही सुनावणी न्या. सिक्री आणि न्या. अशोक भूषण यांच्या पीठासमोर होत आहे. आता हे पीठ कोणता निकाल देते याकडे न्यायालयीन वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. सरन्यायाधीशच सर्वोच्च असतात असा निकाल यापूर्वीच्या एका याचिकेवर दिला गेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)