शांतिपूर्ण सहजीवनाचा भारत एक आदर्श – हसन रुहानी 

हैद्राबाद (तेलंगणा) – जेथे वेगवेगळे धर्म, पंथ आणि मते सलोख्याने नांदतात तो भारत एक आदर्श आहे, असे उद्गार ईराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी काढले आहेत. आपल्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्याची सुरुवात त्यांनी दक्षिण भारतातील हैद्राबादमधून केली. पर्शिया आणि हैद्राबाद यांच्यातील गेल्या 500वर्षांच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नातेसंबंधांची त्यांनी आठवण करून दिली. गुरुवारी ते हैद्राबादला पोहचले तेव्हा त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. शुक्रवारी त्यांनी कुतुबशाहीच्या सुलतानांच्या आणि शाही परिवारातील सदस्यांच्या कबरी असलेल्या सात प्रसिद्ध मकबऱ्यांना भेटी दिल्या.

कुतबशहांनी 1518 ते 1687 गोवळकोंड्यावर राज्य केले. हैद्राबाद शहर सुलतान मोहम्मद कूली याने 1591 साली वसवले. हैद्राबादमधील इमारती, पेहराव आणि आहार पाहून हैदराबाद आणि ईराण यांच्यातील संबंधाची आणि साम्याची जाणीव आजही होते. हैद्राबादची मक्का मशीद सुन्नी पंथीयांची असली तरी शिया नेता असलेले हसन रुहानी यांनी मशिदीला भेट दिली. शुक्रवारच्या प्रार्थनेच्या वेळी . नमाज अदा केला आणि नमाजींना संबोधले. गेल्या 325 वर्षात प्रथमच एका राष्ट्रप्रमुखाने मक्का मशिदीत नमाजींना संबोधले. शिया पंथीयासाठी मक्का मशिदीचे दरवाजे त्यांच्यासाठी प्रथमच उघडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मक्का मशिदीचा राजमिस्त्री हिंदू होता आणि त्याने
8,000 कामगारांना घेऊन मशिदीचे बांधकाम केले.

-Ads-

रुहानी यांनी शिया आणि सुन्नी यांच्या एकतेवर भर दिला आहे. इराक आणि सीरियासारख्या देशांत पश्‍चिमी देश जाणीवपूर्वक फूट पाडत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध धर्मांमध्ये शांती आणि सहास्तित्वचे उगमस्थळ म्हणून भारताचा त्यांनी गौरव केला आहे. शिया, सुन्नी, सूफी… सारेजण भारतात एकोप्याने राहत आहेत असे त्यांनी सांगितले. ईराणला भारतासह सर्व देशांशी मैत्रीचे संबंध हवे आहेत यावर त्यांनी जोर दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)