शांततेसाठी शेजारील देशांशी चर्चा करू

संसदेतील भाषणात पाकिस्तानी पंतप्रधानांची घोषणा

इस्लामाबाद: शेजारील देशांशी असलेले संबंध सुरळीत करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्याशी आमचे सरकार चर्चा करील अशी घोषणा पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर संसदेत केलेल्या पहिल्याच सविस्तर निवेदनात त्यांनी आपल्या सरकारची ही भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तानपुढील खरे आव्हान आर्थिक स्वरूपाचे आहे त्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याचा मनोदयही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला आहे.

देशावर सध्या मोठे कर्ज आहे त्यासाठी त्यांनी नवाज शरीफ सरकारवर यावेळी कडाडून टीका केली ते म्हणाले की पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा 28 ट्रिलियन रूपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या दहा वर्षातच हा कर्जाचा बोजा वाढला असून देशाच्या इतिहासात आजवर पाकिस्तानवर इतके प्रचंड कर्ज कधीही झालेले नव्हते असे त्यांनी म्हटले आहे. नवीन कररचना, काटकसर, आणि भ्रष्टाचार निर्मुलन या उपाययोजनांद्वारे पाकिस्तान वरील कर्ज कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करू असे त्यांनी यावेळी नमूद केले. या कर्जाच्या प्रचंड बोजाखाली आपली अर्थव्यवस्था दबली असून आपल्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठीही आपल्याला पुन्हा कर्ज घ्यावे लागणार आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

शेजारील राष्ट्रांच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की सीमेवर शांतता असल्याशिवाय पाकिस्तानात शांतता नांदणार नाहीं ही बाब लक्षात घेऊन आम्ही शेजारील राष्ट्रांशी या विषयी चर्चा करण्यास तयार आहोत. देशातील अन्य सामाजिक समस्यांचा उल्लेख करून ते म्हणाले की न्याय व्यवस्था, शिक्षण, नागरी सेवा, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात व्यापक सुधारणा होण्याची गरज असून आम्ही त्या सुधारणा टप्प्याटप्याने लागू करणार आहोत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)