“शांतता राखत सनशीर मार्गाने आंदोलन करा’

चिंबळी- राज्यभर मराठा मोर्चाच्या वतीने क्रांतीदिनी (दि. 9) तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्‍वभूमीवर आळंदी पोलीस ठाण्याच्या वतीने हद्दीतील अकरा गावांना शांतता राखत सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 6) चिंबळी येथे ग्रामस्थांची बैठक घेत पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे यांनी क्रांतीदिनी सनदशीर मार्गाने आंदोलन करीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची दक्षता घेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. यावेळी बाजार समिती संचालक पांडुरंग बनकर, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब बटवाल, आप्पासाहेब लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य खंडू पाटारे, हेमंत जैद, शिवाजी कड, विश्‍वास बर्गे, लक्ष्मण सोनवणे, बाजीराव बनकर, साखरचंद लोखंडे, राजेंद्र जैद, भानुदास कड, शंकर पांडुरंग जैद,बाळासाहेब जाधव, चेतन बर्गे, पोलीस हवालदार नितीन बनकर, पृथ्वीराज पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)