शांघाय सहकार्य संघटनेशी संबंध अधिक दृढ होणार – निर्मला सीतारमण

नवी दिल्ली – शांघाय सहकार्य संघटना संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारत प्रथमच सहभागी झाला असून, शांघाय सहकार्य संघटनेच्या भागीदारांसमवेत असलेले प्राचीन संबंध अधिक दृढ करण्यावर भारत भर देणार असल्याचे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

आर्थिक, व्यापार आणि सांस्कृतिक सहकार्य वृद्धींगत करण्यासाठी संवाद आणि ठोस उपाययोजना यावर आधारित भागीदारीसाठी भारत उत्सुक असल्याचे त्या म्हणाल्या. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांनी या प्रदेशातल्या तसेच व्यापक आंतरराष्ट्रीय मुद्यासंदर्भात संवाद वृद्धींगत करावा, असे आवाहन त्यांनी सदस्य राष्ट्रांना केले.

-Ads-

हवामान बदल, सायबर सुरक्षा, याचबरोबर अंमली पदार्थांची तस्करी सारख्या आंतर राष्ट्रीय गुन्ह्यांसंदर्भात सर्व संबंधित देशांचा सहभाग आणि सहकार्यात्मक चौकटीवर आधारित तोडग्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय दहशतवाद हा समाजाला असलेला सर्वात मोठा धोका असून, दहशतवादामुळे विकासाला खीळ बसण्याची भीती आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या देशांनी दहशतवाद कदापी खपवून घेतला जाणार नाही, असे धोरण अंगीकारावे असे आवाहन त्यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)