शहीद वजीर रास्ते यांनी देश धर्म पाळला – डॉ. आसबे

नीरा नरसिंहपूर- शहीद वजीर रास्ते यांनी राष्ट्रासाठी प्राणाची आहुती देऊन आई, वडीलांना जगात मान मिळवून देत देश धर्म पाळून तो कसा असतो हे दाखवून दिल्याचे कामधेनू परीवाराचे डॉ. लक्ष्मण आसबे यांनी सांगितले.
ओझरे (ता. इंदापूर) येथे कारगील शहीद वजीर रास्ते यांच्या 18व्या पुण्यस्मरण श्रध्दांजली कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन डॉ. आसबे बोलत होते. यावेळी वीरमाता बायडाबाई व वीरपिता दत्तात्रेय रास्ते, कॅप्टन लक्ष्मण माने, विरपत्नी सुरेखा जाधव, अभिनेते शिवाजी गुणवरे, एपीआय महेंद्रसिंग निंबाळकर, शरद गायकवाड, डॉ. सिध्दार्थ सरवदे, मोहन खंडागळे, अनिल पाटील, गजेंद्र रास्ते, सोमनाथ रास्ते, नितीन रास्ते, दिलीप रास्ते, कुमार रास्ते आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ. आसबे म्हणाले की, शहीद वजीर रास्तेंचे स्मारक ही देशाची संपत्ती असून ग्रामस्थांबरोबर तालुक्‍याने वीराची भुमी म्हणून गावाची ओळख निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहीदांचे स्मारक हे तरुण पिढीबरोबर सर्वांना प्रेरणास्थान म्हणून नावारुपाला येणे गरजेचे आहे. माजी सैनिक संघटनेचे संस्थापक कॅप्टन लक्ष्मण माने, अभिनेते शिवकुमार गुणवरे, शरद गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सोमनाथ रास्ते यांनी केले. सुत्रसंचालन भरत रास्ते यांनी तर गजेंद्र रास्ते यांनी आभार मानले. यावेळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)