शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना आदरांजली

देहुरोड, (वार्ताहर) – देहुरोड मेन बाजार पेठेत 23 मार्च शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजीत करण्यात आले.

शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव युवा प्रतिष्ठान आणि यंग फ्रिडम फायटर्सने 23 मार्च शहीद दिनानिमित्त देहुरोड येथील वैश्‍य समाज मंदिरात रक्‍त गट तपासणी व रक्‍तदान शिबिरात सुमारे 35 दात्यांनी रक्‍तदान केले. येथील मेन बाजार पेठेत नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात सरबत वाटप केले. सायंकाळी मेणबत्ती प्रज्वलीत करून तिरंगा उंचावून वंदे मातरम्‌, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, शहीद भगतसिंग-राजगुरू-सुखदेव अमर रहे, अशा घोषणांत बाजार पेठेतून रॅली काढली व आदरांजली अर्पण केली.

सतनाम सिंग, गुरूमितसिंग रत्तू, तरलोचनसिंग रत्तू, अमोल व्यवहारे, पंकज व्यवहारे, रिनोव्ह मॅथील, सूर्यकांत सुर्वे, अमित वाल्मीकी, आयुब शेख, अजहर अत्तार, विजय साबळे, हनीफ शेख, के. सी. बिडलान, रेणु रेड्डी, उषा रोकडे यावेळी उपस्थित होते. उपस्थितांना “पर्यावरण राखा-प्रदूषण टाळा’ चे आवाहन करून वृक्ष रोपाचे वाटप केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)