शहीद दिनानिमित्त राजगुरूनगरात तिरंगा पदयात्रा

राजगुरूनगर- शहीद दिनानिमित्ताने राजगुरूनगर शहरात बजरंग दल, खेड प्रखंड आयोजित बलिदान स्मरण दिन कार्यक्रमातील तिरंगा पदयात्रेला हजारो तरुणांनी उपस्थिती लावली.
हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्ताने खेड तालुक्‍यातील 23 गावांतून राजगुरूनगर येथे आलेल्या मशाल ज्योती घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने मशाल यात्रा काढण्यात आली. या मशाल यात्रेत देशभक्‍तीपर गीतांच्या तालात युवकांनी 30 फुटी तिरंग्याची पदयात्रा एसटी बसस्थानक राजगुरू पुतळा ते हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ स्मारक पर्यंत तिरंगा पदयात्रेतून मार्गक्रमण केले. ही पदयात्रा सायंकाळी साडेसातच्या सुमारस राजगुरू वाड्यावर पोहोचली.
दरवर्षी ठीक सायंकाळी 7.30वा. संपूर्ण शहराची वीज घालवण्यात आली आणि हुटर वाजल्यानंतर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव या क्रांतीकारका ना दोन मिनिटांचे मौन पाळून मानवंदना देण्यात आली. यावेळी संपूर्ण स्मारकात महिलांनी मेणबत्त्या पेटवल्या होत्या सायरन वाजल्यानंतर त्या विझवून हुतात्म्यांना या मानवंदना दिली. या वर्षी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण स्वराज्यरक्षक मालिका फेम दिवेश मेदगे या बालकलाकाराला हुतात्मा राजगुरू क्रांती जागर पुरस्कार व संगीतसम्राट सोहम गोराणे यास हुतात्मा राजगुरू क्रांती गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक नीलेश आंधळे, जिल्हा मंत्री संदेश भेगडे उपस्थित होते. तत्पूर्वी डॉ. परीक्षित सचिदानंद शेवडे (लेखक व व्याख्याते) यांनी क्रांतिकारक आणि आजची परिस्थिती या विषयावर तरुणांसोबत सुसंवाद साधला. यानंतर नाटिका मंच आयोजित संस्थेची भारत मातेवर आधारित 45 मिनिटांची नाटिका सादर करण्यात आली.
एकंदरीत राजगुरूनगर शहरातील विविध कार्यक्रमांनी शहराचे वातावरण देशभक्‍तीमय झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बजरंग दलाचे तालुका संयोजक वीरेंद्र भागवत, गणेश मांजरे, दत्ता पोखरकर,मोहनदास गावडे, सिद्धेश गायकवाड, महादेव गणेशकर, महेश गिरी, शुभम आर्विकर, अक्षय पऱ्हाड यांनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)