शहीद जवानाच्या मृतदेहाला बांधली बहिणीने राखी…

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – राखी पौर्णिमेच्या दिवशी घरी आलेल्या शहीद जवानाच्या मृतदेहाला बहिणीने राखी बांधण्याचा हृदयद्रावक प्रसंग कठुआच्या घगरोड गावात घडून आला. केरन सेक्‍टरमध्ये देशसेवेत शहीद झालेल्या रायफलमन निहाल गुरुंग याचा ,मृतदेह त्याच्या गावात पोहचला तेव्हा सारा गाव शोकाकूल झाला. त्याच्या बहिंणींनी रडून रडून आकांत केला होता. शहीद निहाल गुरुंगची छोटी चुलत बहीण बिपाशा गुरंग त्याला दर वर्षी राखी बांधत असे. या वर्षी तिने राखी बांधली, पण त्याच्या मृतदेहाला.

आपला भाऊ आपल्याशी एक अक्षरही बोलला नाही आणि राखी बांधल्यानंतर नेहमीप्रमाणे त्याने आपल्याला काही दिले नाही, याचे मोठ्‌ दु:ख आहे तिला. मी भावाशी भांडायची, त्याच्यावर रुसून बसायची, पण तो माझ्यावर असा रुसून बसेल आणि बोलणरही नाही याची मी कल्पनाही करू शकत नाही असे ती म्हणाली.

गेल्या वेळी, तीन महिन्यांपूर्वी निहाल घरी आला होता, तेव्हा सांभाळून राहा; असे ती त्याला म्हणाली होती. तेव्हा निहालने उत्तर दिले, वर्दी घातली आहे, तर कर्तव्य निभावलेच पाहिजे. त्याने आपले कर्तव्य निभावले आहे, असे बिपाशाने सांगितेले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)