शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी पदयात्रा

निगडी – जम्मू काश्‍मीर येथील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतीय जवान शहीद झाले. या जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी चिखलीतील मोरेवस्ती येथील सिद्धेश्‍वर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून मदत निधी पदयात्रा काढण्यात आली.

यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्येष्ठांनी शहीद जवान अमर रहे, वंदे मातरम्‌, जय जवान, जय किसान, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, शहिदांच्या कुटुंबासाठी सढळ हाताने मदत करा, असे फलक हातात घेऊन पदयात्रा काढली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिद्धेश्‍वर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष लालासाहेब मोरे, उपाध्यक्ष हरिश्‍चंद्र जाधव, सचिव उमेश कोठोळे, खजिनदार ओंकार राजगुरे, प्रभाकर धनोकार आदी यामध्ये सहभागी झाले होते. मदत फेरीतील डब्ब्यामध्ये नागरिक, दुकानदार, व्यापारी आदरपूर्वक मदत करीत होते. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)