शहीदांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञता पुरस्काराने गौरव

पिरंगुट-मुळशी तालुक्‍यामध्ये असलेल्या हुतात्मा राजगुरू संघ यांच्या वतीने सीमेवरती दुष्मनाशी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ शहीद दिनाचे औचित्य साधत त्यांच्या कुटुंबाला कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मुळशी तालुक्‍यामध्ये असलेल्या हुतात्मा राजगुरू संघ मुळशी यांच्या वतीने भारतीय सैन्यामध्ये असलेल्या वीर सैनिकांपैकी जे सैनिक शहीद झालेले आहेत, त्या शहीद जवानांच्या कुटुंबाला शहीद दिनाचे औचित्य साधत राज्याचे माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार यांच्या हस्ते कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शहीद मेजर कुणाल गोसावी, दत्तात्रय कृष्णा भोसले, सौरभ नंदकुमार फराटे या शहीद जवानांच्या कुटुंबाना सन्मानित करण्यात आले.
विविध क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा ही सत्कार करण्यात आला. त्यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेते ऐश्वर्या रावडे, रामचंद्र खानेकर, कैलास मोहोळ, श्रेया कंधारे, वैष्णवी मांडेकर, वेदांत दुधाने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सभापती तुकाराम हगवणे, माजी गटनेते शांताराम इंगवले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आमराळे, माजी सभापती लक्ष्मीताई सातपुते, ज्येष्ठ नेते नानासाहेब शिंदे, माजी उपसभापती भानुदास पानसरे, भाविसेचे उपजिल्हाध्यक्ष राम गायकवाड, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश भेगडे, माजी तालुकाप्रमुख नामदेव भिलारे, सुदाम भुंडे, दीपक सदावर्ते, कॅप्टन सुहासे सर, मधुकर पायगुे, जीवनमामा खानेकर, माउली साठे, बाळासाहेब घावरे, विठ्ठल दहीभाते, जालिंदर सुतार, बाळासाहेब आल्हाट, शांताराम काकडे, शत्रुघ्न सोनावणे, गणेश सुतार, उत्तम आगरवाल, अविनाश बलकवडे, स्वाती ढमाले, कैलास मारणे, दिलीप गुरव, सुवर्णा मारणे, स्वाती सुतार, सतीश सुतार, पांडुरंग गोळे, राजाभाऊ मारणे, सुभाष गिरीगोसावी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, अध्यक्ष माऊली कंधारे, उपाध्यक्ष राम गायकवाड, अमित कुढले, रोहिदास धुमाळ, जयसिंग गायकवाड, अविनाश धनलोबे, अमित जाधव, पवार सर, दीपक करंजावणे, न्यानोबा सुतार, शेखर शिंदे, निलेश शिंदे, उमेश वाटाणे, ज्ञानेश्वर खानेकर, सतीश पवार, नंदकुमार बलकवडे, नितीन गायकवाड, राजू वाघिरे, सौरभ गवारे, भाऊ आखाडे, प्रसाद कारेकर, सनी राऊत यांनी केले.

  • ज्या सैनिकांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्या सैनिकांच्या कुटुंबाचा सन्मान करणे हे खरोखरच चांगले व मानाचे काम आहे. हे काम हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठान करीत आहे तेव्हा त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो व त्यांनी त्यांचे काम हे असेच चालू ठेवावे.
    -शशिकांत सुतार, माजी मंत्री

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)