शहिदांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे प्रत्येकाचे कर्तव्य

रांजणगाव गणपती- देशसेवा करताना शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी केले. कोंढापुरी (ता. शिरूर) येथे क्रांतिवीर प्रतिष्ठान, शिरूर तालुका भारतीय माजी सैनिक संघ यांच्या वतीने शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा भाऊबीज आणि कृतज्ञता दिवस सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.
कोंढापुरी (ता. शिरूर) येथील शहीद सैनिक सुभेदार माणिकराव देवराम-मुरादे यांच्या घरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुभेदार माणिकराव मुरादे हे 11 सप्टेंबर 2004 साली शहीद झाले आहेत. यावेळी सुभेदार माणिकराव मुरादे यांच्या पत्नी मीरा मुरादे आणि त्यांच्या कुटुंबियांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, साडी चोळी, मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांचगे, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, ग्राहक पंचायतीचे धनंजय गायकवाड, रमेश टाकळकर, कोंढापुरी गावचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, सरपंच नंदा ढसाळ, शिरुर तालुका माजी सैनिक संघाचे पदाधिकारी शिवाजी कोहोकडे आदी उपस्थित होते. यावेळी क्रांतिवीर प्रतिष्ठान आणि शिरूर तालुका माजी सैनिक संघ हे माजी सैनिकांचे पहिले अधिवेशन शिरूर तालुक्‍यात भरवणार असल्याची माहिती संजय पाचंगे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)