शहाजीराजे महाविद्यालय ग्रंथालय

प्रभात स्पेशल : ग्रंथालय चळवळ आणि वाचनसंस्कृती

खटाव  चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थच्या शहाजीराजे महाविद्यालयाचे ग्रंथालय 50 वर्षा पासूनचे आहे. शिक्षण प्रेमीआदरणीय चंद्रहार पाटील (दादा) यांनी सन 1965 साली शहाजीराजे महाविद्यालयाची स्थापना केली तेंव्हापासून ग्रंथालय विद्यार्थी, शिक्षक, पुस्तकप्रेमी यांच्यासेवत अविरत सज्य आहे. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणा बंरोबरच संशोधनासाठी हे ग्रंथभांडार उपयोगी या उदात्य हेतूने ग्रंथालयाची निर्मिती केली गेली. ग्रंथालयात 40 हजारांवर पुस्तके उपलब्ध आहेत. महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही विद्या शाखतील विद्यार्थ्यांसाठी हा अमुल्य असा ठेवाच आहे. ग्रामीण भागातील हे ग्रंथालय मुलांना पथप्रदर्शक सिद्ध होत आहे. अशी माहिती डॉ. यु. आर. जाधव यांनी दिली.

बुधचे सावित्रीबाई फुले वाचन मंदिर

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सावित्रीबाई फुले वाचन मंदिर व संस्कार केंद्र बुध या संस्थेची स्थापना ऑगस्ट 2001मध्ये गावातील शासकीय सेवेत असणारे क्‍लास वन अधिकारी दिलीप जगदाळे, वैभव राजेघाटगे, विजय घाटगे, दीपक नलवडे, अरूण पवार, अजित त्रिपुटे, समीर गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्ते कै. माणिकताई सातभाई, के. डी. पवार, विजय पवार, नितीन गाडे यांच्या पुढाकारातुन सुरू झालेले जेमतेम 300 ग्रंथाचे ग्रंथालय आज बालवाङमय, चरित्र, कथा, कादंबरी, कविता, स्पर्धा परीक्षा, आध्यात्मिक, संदर्भ ग्रंथ ई. विभागानुसार 2678 संख्येपर्यत मारली आहे. ग्रंथालय दररोज सकाळी 8.30 ते सांय 5.30 ते 7.30 पर्यत मंगळवार व शासकीय सुट्टी वगळता सुरू असते. ग्रंथाबरोबरीने वृत्तपत्रे व नियतकालिके 15 वाचकांची वैचारिक भूक भागवतात

खटावचे महात्मा गांधी वाचनालय

महात्मा गांधी वाचनालयाचा आरंभ सन 1944 साली स्वर्गीय आमदार केशवराव पाटील यांच्या संकल्पनेतून झाला. वाचनालया मध्ये सध्या आध्य ात्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक व कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह, नाटक, बाल साहित्य, ऋषी विषयक पुस्तके चरित्र, आत्मकथा आदी प्रकारची 10 हजारहून अधिक पुस्तके येथे उपलब्ध आहेत. त्याच बरोबर 9 वर्तमानपत्रे, 5 साप्ताहिक, 4 मासिक इत्यादी साहित्य वाचकांसाठी उपलब्ध आहे. वर्तमान स्थितीत सभासद संख्या 100 च्या वरती आहे. सभासदाकडून 40 नाममात्र फी आकारली जाते. सध्या वाचनालयास 96 हजार वार्षिक अनुदान मिळत आहे परंतु खर्चाचा ताळमेळ लावता ते अपुरे पडत आहे. अशी माहिती ग्रंथपाल अशोक पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)