शहांनी मांडलेली भूमिका अवमानजनक – चंद्राबाबू

अमरावती – भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रातून मांडलेली भूमिका अवमानजनक आहे. पत्रात खोट्या बाबींची जंत्री आणि अर्धसत्य आहे, असा पलटवार आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे प्रमुख एन.चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.

शहा यांची भाषा राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला शोभा देणारी नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विविध केंद्रीय योजनांचे श्रेय मोदी सरकारला देत नसल्याच्या आरोपालाही चंद्राबाबूंनी प्रत्युत्तर दिले आहे.

विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्रिपदावर असताना गुजरात सरकारने केंद्रीय योजनांसाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कॉंग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या छायाचित्रांचा वापर केला होता का? त्यासंबंधीची छायाचित्रे ते दाखवू शकतात का, असा सवाल त्यांनी यासंदर्भात केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)